आतापर्यंत बारा लाख लोकांचे युक्रेनमधून स्थलांतर
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत जवळपास बारा लाख नागरिकांनी युक्रेन सोडल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनची मोठ्या प्राणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. युक्रेनमधील नागरिक दहशतीखाली असून, त्यांनी स्थलांतरणाला सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये जवळपास बारा लाख लोकांनी युक्रेन सोडला असल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आला आहे. अद्यापही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत.