‘गुलाबी कॅम्पेन’वरून दमानियांचा अजितदादांवर निशाणा, केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी…
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गुलाबी कॅम्पेनची सध्या चांगलीच चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत असताना गुलाबी रंगाचा वापर केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. अशातच गुलाबी कॅम्पेनवरून दमानिया यांनी टीका केली आहे.
गुलाबी कॅम्पेनवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात ट्वीटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली तर गुलाबी जॅकेट घालून आणि बसेस फिरवून जन सन्मान होत नसतो, असे म्हणत अंजली दमानियांनी अजित पवार गटावर खोचक टीका केली आहे. ‘गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार न करणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वल्याचा वाल्मिकी होत नसतो.’ असं ट्वीट करून अंजली दमानिया यांनी अजित दादांवर टीका केली आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या गुलाबी कॅम्पेनच्या टीकेवरून अमोल मिटकरी यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा काय म्हणाले अमोल मिटकरी?