अरे बाप रे… उर्फी जावेदने ‘त्या’ ट्विटवरून कंगनाला फटकारले
कंगना रणौतच्या ट्विटवर उर्फी जावेदने टीका, काय रंगले दोघींमध्ये ट्विटरवॉर?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिने आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. कंगना रणौतने मुस्लिम अभिनेत्यांवर केलेल्या ट्विटवर उर्फी जावेद हिने टीका केली आहे. या दोघींच्या ट्वीटची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘या देशाने सर्व खानांवर प्रेम केलं, तर काही वेळा फक्त खानांवरच प्रेम केलं. त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणे अयोग्य आहे. संपूर्ण जगात भारतासारखा देश नाही’, असे कंगना म्हटली होती. तर कंगनाच्या ट्विटला उर्फीने उत्तर दिले आहे. उर्फी जावेद म्हणाली, ‘अरे बाप रे… कलाकारामध्ये हिंदू, मुस्लिम अशी विभागणी. कला ही धर्माने विभागली जात नाही, कलाकार हा कलाकार असतो. ‘
Published on: Jan 30, 2023 12:48 PM