पुण्यातील शिरुरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात राडा
दोन कुटुंबात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चुलत भावंडांमध्ये राडा झाला. पुणे जिल्ह्याच्या (Pune Crime) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे हा प्रकार घडला.
दोन कुटुंबात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून चुलत भावंडांमध्ये राडा झाला. पुणे जिल्ह्याच्या (Pune Crime) शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे हा प्रकार घडला. लाठ्याकाठ्या आणि तलवारी हातात घेऊन दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर (Video) आला आहे. जमिनीच्या वादातून भाऊच भावाचा वैरी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. या प्रकरणात दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.