पुणे हादरलं, स्कूल बसमध्येच चालकाकडून 2 चिमुकलींवर अत्याचार, 45 वर्षीय नराधमानं काय दिली होती धमकी?
पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जात पण त्याच पुण्यात लाजीरवाणी घटना घडल्याचे समोर आले आहे. घरी आल्यानंतर चिमुकलीला तिच्या गुप्तांगाजवळ वेदना होऊ लागल्या. तिच्या आईने विचारपूस केली असता बस चालकाच्या दुष्कर्माबद्दल आईला लक्षात आले आणि हा प्रकार उघडकीस आला.
बदलापूर येथील शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद अजूनही उमटताना दिसताय. बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर बस चालकाकडून अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली आहे. इतकंच नाहीतर घडलेल्या घटनेची कुठेही वाच्यता करून नये म्हणून ४५ वर्षीय या बस चालक असलेल्या नराधमाने त्या मुलींना धमकीही दिली होती. दरम्यान, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ४५ वर्षांच्या नराधमाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून हा नराधम आरोपी सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यावर अत्याचार करत होता. बस चालक हा दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने या चिमुकलींना दिली होती.