Pimpri-Chinchwad मध्ये शिवीगाळ असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर बनवल्यानं 2 अल्पवयीन मुलींना अटक

Pimpri-Chinchwad मध्ये शिवीगाळ असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर बनवल्यानं 2 अल्पवयीन मुलींना अटक

| Updated on: Jan 31, 2022 | 12:43 AM

पिंपरी चिंचवडमध्ये असाच एका अल्पवयीन तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक सतरा वर्षांची मुलगी प्रत्येक व्हिडीओत शिवीगाळ करताना दिसली होती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या तरुणीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी : पिंपरी- शहरात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेकदा शस्त्रांसोबत फोटो व्हिडीओ शेअर करता धमकी देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये मुलीही मागे नसल्याचे दिसून आलं होतं. अखेर पोलिसांनी याचप्रकरणातील अल्पवयीन तरुणींना अटक (Minor girl arrested) केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये असाच एका अल्पवयीन तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक सतरा वर्षांची मुलगी प्रत्येक व्हिडीओत शिवीगाळ करताना दिसली होती. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या तरुणीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आता या मुलींची पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे.

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणं बंद करा, Vikram Gokhale यांचे आवाहन
Salman Khan बॉलिवूडमध्ये उन्माद माजवतोय, Abhijit Bichukal चा आरोप | Bigg Boss 15