Aaditya Thackeray | दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत, आपण काळजी घेणे गरजेचे – आदित्य ठाकरे

| Updated on: Nov 29, 2021 | 6:07 PM

दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हायरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबईकरांच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमिक्रॉन व्हायरंटचा फैलाव होत असल्याची बातमी ताजी असतानाच मुंबईकरांच्या काळजात धस्स करणारी बातमी आहे. गेल्या 19 दिवसात मुंबईत दक्षिण आफ्रिकेतून शे-दोनशे नाही तर तब्बल एक हजार लोक आले आहेत. या लोकांची ट्रेसिंग सुरू करण्यात आली आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूने हाहा:कार उडवला त्या देशातून मुंबईत एक हजार लोक आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 10 नोव्हेंबरपासून मुंबईत 1 हजारच्या आसपास लोक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांना ट्रेस केलं जातं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Published on: Nov 29, 2021 05:55 PM