वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आला वैताग; पठ्ठ्याने दुचाकीलाच लावली आग
पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे.
हैदराबाद: पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे. संबंधित दुचाकीस्वाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून, मागच्या चौकात दंड भरला होता. परंतु थोडे पुढे आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडून एक हजारांचा दंड करण्यात आला. दंडाला वैतागलेल्या दुचाकीस्वाराने भरचौकात आपली दुचाकी पेटवून संताप व्यक्त केला आहे.