Aurangabad | औरंगाबादच्या तोंडाळी गावात दरोडेखोरांचा दोन महिलांवर बलात्कार
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी या वस्तीची केवळ लूटच केली नाही तर दोन महिलांवर बलात्कार केल्याचीही माहिती हाती आली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याला (Robbery in Tandoli) हादरा बसला आहे.
महिलांवर सामुहिक बलात्कार
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी येथील वस्तीची लूट केली. तसेच येथील दोन महिलांवर सामुहिक बलात्कारदेखील केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.