कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, ‘ठाणे की रिक्षा’ला ‘भांडूप का भामटा’नं पलटवार

| Updated on: Mar 24, 2025 | 3:09 PM

ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांनी कामराचे गाणे गात महायुतीवर टीका केली, तर ज्योती वाघमारे यांनीही गाण्यातून कामरासह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे तयार केलं. यानंतर एकनाथ शिंदेंची सेना चांगलीच आक्रमक झाली. स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामरायाने यावरून नवीन वाद ओढवून घेतला आहे. यानंतर संतप्त शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या मुंबईतील स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून कुणाल कामराच्या भूमिकेचे समर्थन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कुणाल कामरानंतर दोन्ही शिवसेनेच्या रणरागिणींची जुगलबंदी पाहायला मिळाली. ”थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए… मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें…”, असं सुषमा अंधारे यांनी म्हणत कुणाल कामरा याने विडंबन केलेलं गाणं पुन्हा एकदा गायलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला डिवचलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील जशासतसे उत्तर देण्यात आलंय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला शिंदेंच्या ज्योती वाघमारे यांनी पलटवार केलाय.

Published on: Mar 24, 2025 03:09 PM
Farmer’s News : शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
Santosh Deshmukh Case : अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट