अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसचे उदात्तीकरण ‘सामना’तून? सरकारच्या बड्या मंत्र्याकडून पुरावे सादर

| Updated on: Feb 09, 2024 | 1:09 PM

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला. गुंड आणि आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणातून आरोप-प्रत्यारोप होताय. सामनातून मॉरिसला मोठं करण्याचं काम झालं आणि मॉरिसच्या सामाजिक कार्याला सामनातून पांठिबा होता, असा मोठा दावाही सरकारमधील बड्या मंत्र्यानं केलाय.

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : दहिसरमधील गोळीबारानं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल गोळीबार करण्यात आला. गुंड आणि आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणातून आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच सरकारमधील महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘स्पर्धेमधून सगळं घडलं असून घोसाळकर आणि मॉरिस हे गँगवार हे ठाकरे गटातील आहे. तर सामना या वृत्तपत्रातून मॉरिसला मोठं करण्याचं काम झालं’, असा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केला आहे. तर सामनातून मॉरिसला मोठं करण्याचं काम झालं आणि मॉरिसच्या सामाजिक कार्याला सामनातून पांठिबा होता, असा मोठा दावाही उदय सामंत यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, ‘सामना’मध्ये आलेल्या एका बातमीत म्हटले की, ‘कफ परेड ते शिर्डी ११५ दिवसांचा मदत यज्ञ’, अशा अनेक बातम्या मॉरिसच्या सामन्यातून आल्या आहेत. तसेच मॉरिस याने अनेक वेळा ट्विट करुन आपले नेते कोण आहेत, आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, हे सांगितले आहे. तर उबाठा शिवसेना वाढवायची आहे, असे त्याने म्हटले होते.

Published on: Feb 09, 2024 01:09 PM
राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून 6 नावं चर्चेत, कुणाची लागणार वर्णी? ऐनवेळी कुणाचा पत्ता कट?
अभिषेक घोसाळकर मॉरिस मैत्रीच्या विश्वासात फसले अन् घात झाला, जाणून घ्या हत्याप्रकरणाची A टू Z कहाणी