अनिल परब आणि उदय सामंत यांच्यात सभागृहात खडाजंगी, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप

| Updated on: Mar 23, 2023 | 8:26 PM

VIDEO | विधान परिषदेच्या सभागृहात आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मंत्री उदय सामंत हे दोघे नेते पुन्हा आमने-सामने

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांच्यात विधान परिषदेत आज खडाजंगी झाली. यावेळी अनिल परब यांनी राज्य सरकारवर मोठे आरोप केले. खराब कामासाठी मुंबई महापालिकेने ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीला पुन्हा 350 कोटी रुपयांच कंत्राट महानगरपालिकेने दिलंच कसं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला. तर मंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपनीने खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं मान्य केलं. त्यामुळे या दोघांनी एकमेकांवर चांगलेच शाब्दिक वार केल्याचे पाहायला मिळाले. कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल केला जाईल, तशी कारवाई केली जाईल, असं उदय सामंत म्हणाले. तर संबंधित कंपनीने खोटे कागदपत्रे सादर केले हे तुम्ही मान्य केलं ना, मग गुन्हा दाखल कधी होणार? असा प्रश्न अनिल परब यांनी केला. बघा सभागृहात अनिल परब आणि उदय सामंत यांनी काय केले आरोप-प्रत्यारोप…

Published on: Mar 23, 2023 08:22 PM
धर्मांतरविरोधी कायदा आणखी प्रभावी होणार? सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले…
राज ठाकरे यांनी भरसभेत केलेला ‘तो’ गौप्यस्फोट खरा, नितेश राणे यांनी काय केला दावा?