Uday Samant | 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत कॉलेज सुरु करण्याचा विचार : उदय सामंत

| Updated on: Aug 05, 2021 | 9:23 PM

15 सप्टेंबर ते 1ऑक्टोबपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करतोय, असे उदय सामंत म्हणाले. 

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आज नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कॉलेजेस कधी सुरु होतील. यावर भाष्य केलं. काल कुलगुरूंची बैठक झाली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितले आहे. त्याचा आढावा 15 दिवसांत प्राप्त होईल. 15 सप्टेंबर ते 1ऑक्टोबपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करतोय, असे उदय सामंत म्हणाले.

Amruta Fadnavis | पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्के असताना पुणे का सुरु झालं नाही?, अमृता फडणवीस यांचा सवाल
Special Report | पुण्यातल्या निर्बधावरून अमृता फडणवीसांचा हल्लाबोल!