उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं ‘या’ मंत्र्यानं सांगितलं कारण
VIDEO | उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट झाली. उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांच्यात साधारण तासभर चर्चा झाली. या भेटीबाबत शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या राज्यातील पहिल्या संयुक्त सेभेला मविआतील महत्त्वाचे बडे नेते गैरहजर होते. यानंतर गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा इव्हिएम मशीनबाबत अजित पवार यांचं वक्तव्य असेल यावरून महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. तर महाविकास आघाडीमध्ये जे अलबेल नाही ते अलबेल करण्यासाठी काही लोकं शरद पवार यांच्या भेटीला गेली असावीत, असे म्हणत उदय सामंत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.