Uday Samant : भाजपवाल्यांपेक्षा शिंदे अन् अजितदादाच मोदी-मोदी करतात, संजय राऊत यांच्या टीकेवर उदय सामंत यांनी फटकारलं

| Updated on: Oct 16, 2023 | 5:54 PM

VIDEO | भाजपवाल्यांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच जास्त मोदी-मोदी करतात, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.या सडकून टीकेवर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | भाजपवाल्यांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जास्त मोदी-मोदी करतात, असा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी असं वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. बाडगा जास्त मोठ्याने बांग देतो, असे संजय राऊत यांनी म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या सडकून टीकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी उदय सामंत म्हणाले, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मोदीमय नाहीतर संपूर्ण देशच मोदीमय झालेला आहे. तर संजय राऊत हे रोजच मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, ते ज्या दिवशी टीका करता त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अधिक उंचावते, असं म्हणत निशाणा साधलाय.

Published on: Oct 16, 2023 05:54 PM
‘भविष्यात गर्व से कहो हम MIM है म्हणतील’,उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचा निशाणा?
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास…, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी काय दिला इशारा?