Uday Samant | आगामी निवडणुकीत मविआच जिंकणार – उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडनुकाही महाविकास आघाडी जिंकेल अशा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
देगलूरचा किंवा दादरा हवेली निकाल आपण पाहिला असेल त्याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. मागच्या विधानपरिषदेच्या पाच जागांवर निवडणुका झाल्या होत्या. त्या पाच ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता ज्या ज्या निवडणुका होतील पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदारांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झालेलं दिसेल आणि या निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलाय.