Uday Samant | मुख्यमंत्र्यांनी देशाचे नेतृत्व करावं असा कौल सर्व्हेतून समोर : उदय सामंत
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, अशा शब्दात उदय सामंत यांनी भाजपला ललकारले आहे.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, अशा शब्दात उदय सामंत यांनी भाजपला ललकारले आहे. एका वृत्तवाहिनीने देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॉप फाईव्हमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि सध्या ते ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व करत आहेत, त्यावरून त्यांनी देशाचंही नेतृत्व करावं, असाच कौल या सर्व्हेतून आला आहे, असं त्यांनी सांगितलं.