Uday Samant : ‘उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर…’, महायुतीत सुरू असलेल्या शर्यतीत योगेश कदम काय म्हणाले?

| Updated on: Dec 22, 2024 | 5:54 PM

उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे. यानंतर मी पालकमंत्री झालो तरी योगेश कदम पालकमंत्री झाल्यासारखेच आहे, असे उदय सामंत म्हणाले.

महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल खातेवाटप करण्यात आलं. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे. यानंतर मी पालकमंत्री झालो तरी योगेश कदम पालकमंत्री झाल्यासारखेच आहे, असे उदय सामंत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही कुटुंबासारखं काम करतो, आमच्यात समन्वय आहे. ‘उदय सामंत जेष्ठ आहेत. मी त्यांच्याकडे मोठा भाऊ म्हणून पाहतो. उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याला न्याय दिला आहे. त्यामुळे उदय सामंत यांना पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा आहे’, असे योगेश कदम यांनी म्हटले. योगेश कदम यांनी ही भावना व्यक्त केल्यानंतर उदय सामंतांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘योगेश कदम यांनी मनापासून धन्यवाद देतो. मी पालकमंत्री झालो तरी योगेश कदम पालकमंत्री झाल्यासारखेच आहे. त्यांना कोणतं पद मिळालं मला आनंद आहे. आम्ही कुटुंब आहोत. आमच्यात समन्वय आहेत.’, असे त्यांनी म्हटले.

Published on: Dec 22, 2024 05:54 PM