Udayanraje Bhosale यांची हटके स्टाईल; कॉलर उडवून केली चाहत्यांची इच्छा पूर्ण
राजे कार्यक्रमात आल्यावर बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची विनंती केली. त्यानंतर राजेंनीही त्यांची इच्छ पूर्ण करत कॉलरला हात घातला आणि कॉलर उडवली. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचे शरद पवारही फॅन आहेत. एकदा सभेत शरद पवारांनीही राजेंची कॉलर उडवली होती.
सातारा : सातारचे राजे उदयनराजे (Udayanraje) भोसले त्यांच्या हटके स्टाईने नेहमी चर्चेत असतात. उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल तर सर्वांना प्यारी. राजे कधी भरल्या सभेत स्टेजवर कॉलर (Udayanraje collar video)उडवतात. तर कधी शरद पवारांच्या (sharad Pawar) समोर. त्यांच्या बेधडक अंदाज सर्वांनाच आवडतो. आज राजेंनी पुन्हा कॉलर उडवली आहे. त्यांनी सातारा शहरातील एका खासगी कार्यक्रमात कॉलर उडवून त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या कार्यक्रमात अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील उपस्थित होता. मात्र राजेंची ही हटके स्टाईल पाहून सिद्धार्थ जाधवही त्यांचा फॅन झाला असेल. राजे कार्यक्रमात आल्यावर बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची विनंती केली. त्यानंतर राजेंनीही त्यांची इच्छ पूर्ण करत कॉलरला हात घातला आणि कॉलर उडवली. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचे शरद पवारही फॅन आहेत. एकदा सभेत शरद पवारांनीही राजेंची कॉलर उडवली होती.