साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेच्या मैदानात?, कमळावर लढणार की घड्याळावर?

| Updated on: Mar 25, 2024 | 12:29 PM

सातारच्या लोकसभेसाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. आपल्याला तिकीट मिळावं म्हणून राजे दिल्लीत होते. अखेर अमित शाह यांच्यासोहत उदयनराजे भोसलेंची बैठक झाली आणि त्यांचं तिकीट फिक्स झाल्याचेही सांगितले जात आहे.

साताऱ्यातून उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवणार हे पक्क झालं असल्याचे मानलं जात आहे. मात्र कमळावर की घड्याळ्यावर अद्याप निश्चित झालं नाहीये. दरम्यान, लोकसभेच्या तिकीटासाठी उदयनराजे भोसले यांना वेटिंगवर ठेवल्याने विरोधकांनी भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. सातारच्या लोकसभेसाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. आपल्याला तिकीट मिळावं म्हणून राजे दिल्लीत होते. अखेर अमित शाह यांच्यासोहत उदयनराजे भोसलेंची बैठक झाली आणि त्यांचं तिकीट फिक्स झाल्याचेही सांगितले जात आहे. मात्र उदयनराजे भोसले हे भाजपच्या कमळावर लढणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ्यावर लढणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण सातारची जागा सोडण्यास अजित पवार गट तयार नाही. पण राष्ट्रवादीच्या चिन्हावर उदयनराजे भोसले लढण्यास तयार असल्याचे अजित पवार गट आपली जागा सोडण्यास तयार असल्याचे सांगितले जातेय…बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 25, 2024 12:29 PM