काय बाई सांगू, कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना गाण्यातून टोला

| Updated on: Dec 24, 2021 | 10:57 AM

काय बाई सांगू, कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज हे गाण गात खासदार उदयनराजे यांनी जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) आणि सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांच्यात सातारा नगरपालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Council Election) पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला उदयनराजे भोसले यांच्याकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचे आव्हान दिलं. तर, यावेळी खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावर “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” हे गाणे गायले.. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कार्यक्रमादरम्यान उदयनराजे भोसले भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं.

Ratnagiri ST Strike | रत्नागिरीत 3 हजाराहून अधिक एसटी कर्मचारी अजूनही संपावर
औरंगाबादेत मनसेला पुन्हा धक्का; सुहास दशरथे भाजपच्या वाटेवर?