‘शिंदेंची ताकद आज ना उद्या भाजप पुढे नमणार’, कुणी दिला सूचक इशारा
VIDEO | ठाकरे गटाच्या आमदाराचा शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर हल्लाबोल
सिंधुदुर्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. वैभव नाईक म्हणाले, शंभूराजे देसाई यांचाच पक्ष मुळात अधिकृत नाही, यांना भाजपमुळेच आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना सत्तेत बसायला मिळाला आहे. इडी आणि इन्कम टॅक्स यांच्या भीतीमुळे त्यांच्यापाशी एकत्र आलेले लोक आहेत त्यामुळे हा पक्ष अनधिकृत आहे. एखादी गोष्ट करायची आणि त्यानंतर अधिकृत नाही असं सांगायचं, खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. उद्धव ठाकरे हेच भाजपच्या भूमिकेला लगाम घालत होते. त्यामुळे शिंदेंची ताकद आज ना उद्या भाजप पुढे नमणार आहे, अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर हल्लाबोल केलाय.काल छापलेली जाहिरात शिवसेनेची अधिकृत नाही असं म्हणणाऱ्या शंभूराजे देसाई यांना वैभव नाईक यांनी चांगलं सुनावलय.