खैरेंनी मुस्लिमांना सांगितलं, 5 वेळा नमाज पडा; संजय शिरसाटांनी थेट व्हिडीओच लावला

| Updated on: Apr 30, 2024 | 12:14 PM

संजय शिरसाट यांनी या चित्रफीतमध्ये चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिमांबाबत वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंवर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत खैरे हे मुस्लिमांना ५ वेळा नमाज पठण करण्यास सांगतात. बघा व्हिडीओ दाखवत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांची चित्रफीत दाखवत संजय शिरसाट यांनी सडकून टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी या चित्रफीतमध्ये चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिमांबाबत वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंवर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत खैरे हे मुस्लिमांना ५ वेळा नमाज पठण करण्यास सांगतात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर हा माणूस वेडा तर नाही झाला ना… असं म्हणत संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर खोचक निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. बघा व्हिडीओ दाखवत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

Published on: Apr 30, 2024 12:14 PM
महाराष्ट्रातील मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा, कुणी काय केला हल्लाबोल?
बारामतीनंतर शिरूरमध्येही तुतारी चिन्हाचा संभ्रम होणार? निवडणूक आयोगानं कुणाला दिलं चिन्ह?