Video : भाजपचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Mar 20, 2022 | 1:13 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वावरून भाजपला (BJP) फटकारलं आहे. “भाजपचं हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)  यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करतानाच सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच “आपण शिवसंपर्क अभियान (Shivsampark Abhiyan) गेल्यावेळीच राबवणार होतो. […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वावरून भाजपला (BJP) फटकारलं आहे. “भाजपचं हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)  यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करतानाच सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच “आपण शिवसंपर्क अभियान (Shivsampark Abhiyan) गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

Published on: Mar 20, 2022 01:10 PM
370 कलम काढल्यावरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, Sanjay Raut यांनी डिवचले
शिवसेनेची हिंदुत्वाची व्याख्या बदलली – प्रवीण दरेकर