‘भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती पण…’, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपवर बरसले

| Updated on: Jul 27, 2023 | 1:54 PM

VIDEO | 'भाजपचा राम राहिला नाही, तर भाजपमध्ये फक्त आयाराम अन् गयाराम', उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा डिवचलं

मुंबई : उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. या मुलाखतीत त्यांनी हिंदुत्वापासून विविध मुद्द्यावर भाष्य केलं. महानगरपालिकेच्या निवडणुका टाळण्यामागे षडयंत्र आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, ‘षडयंत्रच आहे. मराठीमध्ये दोन शब्द आहेत. त्यातील एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरा म्हणजे मस्ती, भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती आहे. पण शक्तीचा आत्मविश्वास नाही. म्हणून ते सत्ता आहे तोपर्यंत अशा पद्धतीत राबवत आहे, ते सुद्धा सरकारी यंत्रणेतून… ईडी, सीबीआय़, इन्कम टॅक्स हे बाजूला ठेवा त्यांचे काय हाल होतील ते बघा’, असे म्हणत उद्धव ठाकरे भाजपसह सत्ताधाऱ्यावर जोरदार बरसल्याचे पाहायला मिळाले. तर जागा वाटपाचा तिढा लोकसभेपासून विधानसभेपर्यंत आहे आणि तो देशभर होणार आहे. भाजपमध्ये आता राम राहिला नाही तर आता फक्त आयाराम बाकी सगळे गयाराम. हा सगळा आयारामांचा पक्ष आहे. तर आयारामांना तुम्ही सामावून घेताना मुळाता तुमच्या पक्षातील जो राम होता त्याला आता हे फक्त कामापुरता वापरणार का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून उपस्थित केला आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.

Published on: Jul 27, 2023 01:54 PM
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मार्ग मोकळा, मात्र पटोले म्हणतात, ‘होऊ तर द्या, त्यांना भवितव्य…’
मुंबईतील खड्ड्यांवर मनसे ना’राज’; हातात कागदी बोट, शीप घेत केलं अनोख आंदोलन!