‘हिंदुत्व, भाजप अन् कलम ३७०’, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून भाजपला थेट सुनावलं
VIDEO | उद्धव ठाकरे यांचं विरोधकांना खुलं आव्हान; म्हणाले, 'मला संपवताय?...तर तुम्ही संपवा', बघा Uncut मुलाखत
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी काल मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वापासून विविध मुद्द्यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. या मलुाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आमच्या डोक्यात मस्ती नाही, आत्मविश्वास आहे असे थेट म्हणत हा असलेला विश्वास २०२४ ला हुकूमशाहीचा पराभव करेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला पुन्हा एकदा डिवचल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचं वेगळं स्वप्न होतं. हिंदुत्वाचं वेड होतं. हिंदुत्वाच्या एका विचारधारेमुळे त्यांनी समान नागरी कायदा आणि 370 कलम या सारख्या गोष्टींना पाठिंबा दिला, असे म्हणत आता भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे.