Special Report : मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर, तब्येतीवरून चंद्रकांत पाटलांचे सवाल

| Updated on: Jan 13, 2022 | 9:26 PM

ऑनलाईन बैठकीलाही हजर राहण्याएवढी उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाही का ?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंतप्रधानांसमोर राज्याची परिस्थिती मांडली.

कोरोनाच्या परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM modi) 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. मात्र या ऑनलाईन बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thackeray) गैरहजर राहिले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरुन चिंता व्यक्त केलीय. ऑनलाईन बैठकीलाही हजर राहण्याएवढी उद्धव ठाकरेंची तब्येत ठीक नाही का ?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. उद्धव ठाकरेंच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंतप्रधानांसमोर राज्याची परिस्थिती मांडली. चंद्रकांत पाटलांनी चिंता व्यक्त केली असली. तरी काळजीचं काही कारण नाही, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय..मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 तास ऑनलाईन उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्यांची तब्येत चांगली आहे असं मुश्रीफ म्हणाले.

Special Report | यूपीत भाजपची पडझड, शिवसेनेची धावाधाव!
Special Report | जानेवारीतच कोरोना लाट ओसरणार?