भाजपचा नीच खेळ, उद्धव ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप

| Updated on: May 21, 2024 | 11:33 AM

उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर थेट आरोप केला. मुंबईत दिवसभर संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्यात. त्यावरून पत्रकारपरिषद घेत ज्या ठिकाणी शिवसेनाला मतदान होतंय त्याच ठिकाणी मतदानाला विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow us on

मुंबईसह महाराष्ट्रात काल १३ मतदारसंघात लोकसभेचं अंतिम टप्प्यातील मतदान झालं. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. अशातच काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तर मतदानाला दिरंगाई होत अशल्याने पिय़ुष गोयल देखील भडकले. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर थेट आरोप केला. मुंबईत दिवसभर संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्यात. त्यावरून पत्रकारपरिषद घेत ज्या ठिकाणी शिवसेनाला मतदान होतंय त्याच ठिकाणी मतदानाला विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई, ठाणे आणि कल्याण येथील मतदान केंद्राबाहेर बऱ्याच मोठ्या रांगा दिसल्या. काही मतदारांना चार चार तास उभं राहिल्यानंतर आपला मतदानाचा हक्क बजावता आला. तर हा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला तर सकाळचे पाच वाजले तरी मतदान करा, असं आवाहन ठाकरेंनी मतदारांना केलं