VIDEO : CM Sangli Visit LIVE | पूरग्रस्त अंकलखोपच्या सरपंचांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंकलखोपला आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत.
भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंकलखोपला आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. तुमच्यावर आपत्ती ओढवली. त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. त्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन. पण तुम्ही ज्या पद्धतीने गर्दी केली ते भयानक आहे. कारण कोरोना अजून गेला नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात सांगली आहे. त्यामुळे कोरोना होणार नाही याची काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.