ठाकरे-फडणवीस एकत्र! महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा येणार राजकीय भूकंप? बघा Tv9 मराठी रिपोर्ट

| Updated on: Mar 23, 2023 | 11:37 PM

VIDEO | उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधानभवनात एकत्र आणि उलटसुलट चर्चांना उधाण, राजकारणात पडद्यामागं नेमकं घडतंय काय? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सोबत विधानभवनात एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात सोबत असल्याची दृश्यं फार बोलकी आहेत. विधिमंडळात प्रवेश करण्याचं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं टायमिंग एकच झालं. त्यामुळं दोन्ही नेते हसत हसत विधिमंडळात आलेत. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र आल्याने विधीमंडळातच काय, महाराष्ट्रात चर्चा तर होणारच…पण उद्धव ठाकरेंनी तर्क वितर्क लढवू नका म्हणत, राम राम आणि हाय हॅलो, इतकंच झाल्याचं म्हटलंय. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विधीमंडळात सोबत आले. पण राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता काय म्हणाले उद्धव ठाकरे… आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावर काही भाष्य केले का? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 23, 2023 11:37 PM
Tv9 मराठी Special Report : राहुल गांधी यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ अन् विधानभवनात उमटले पडसाद
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सांगलीतील ‘ते’ वादग्रस्त बांधकाम अखेर जमीनदोस्त