Thackeray-Fadnavis Meet | शाहूपुरीत ठाकरे-फडणवीस समोरासमोर, भेटीदरम्यान काय चर्चा झाली?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरीत एकत्र भेटले. अवघे पाचच मिनिटं या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. प्रचंड गोंगाट होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरीत एकत्र भेटले. अवघे पाचच मिनिटं या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. प्रचंड गोंगाट होता. या भेटीत फडणवीसांनी थोडक्यात कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची माहिती देतानाच कोल्हापूरसह राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाँग टर्म प्लान करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शाहूपुरीतील बाजारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तर देवेंद्र फडणवीसांसोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.