रामलल्ला नेमका कुणाचा? अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात जुंपली
अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपल्याची पाहायला मिळत आहे. रामलल्ला कुण्या एकाची नाही तर सर्वांची प्रॉपर्टी असल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला
मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाला अवघे काही दिवस बाकी आहे. मात्र या मंदिराच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसताय. अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपल्याची पाहायला मिळत आहे. रामलल्ला कुण्या एकाची नाही तर सर्वांची प्रॉपर्टी असल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला. तर राम मंदिर कुणी बांधलं हे जनतेला माहिती आहे, असेही ते म्हणाले. कित्येक वर्षापासून सुरू आहे, हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तुम्ही आता आलात.तुम्हाला असं वाटतं जयश्रीराम बोललं की सारे हिंदू तुमच्या सोबत येतील. हाच तुमच्या आणि आमच्या हिंदूत्वात फरत आहे, तर आमच्या हृदयात राम आणि हाताला काम देण्याचं आमचं हिंदूत्व आहे. ना की मोफतमध्ये रामाचं दर्शन देणारं हिंदूत्व आमचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.