मुंबईत उद्धव ठाकरे-राजू शेट्टी यांची भेट अन् हातकणंगलेत इफेक्ट, थेट हकालपट्टीची कुणावर कारवाई?

| Updated on: Jan 05, 2024 | 11:53 AM

मुंबईमध्ये राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचा परिणाम मात्र हातकणंगलेत झाल्याचे पाहायला मिळत आहे. इचलकरंजीत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेतली त्यानंतर ठाकरे यांनी जाधवांची हाकलपट्टीही करून टाकली.

मुंबई, ५ जानेवारी २०२४ : मुंबईमध्ये राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचा परिणाम मात्र हातकणंगलेत झाल्याचे पाहायला मिळत आहे. इचलकरंजीत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी जाधवांची हाकलपट्टीही करून टाकली. कोल्हापुरातील हातकणंगलेमधील लोकसभेचं समीकरण देखील यंदा रंजक बनत चाललंय. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर या भेटीवरून ठाकरेंचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधवांनी नाराजी वर्तवली होती. दरम्यान, राजू शेट्टी कोल्हापुरातून परतण्यापूर्वीच त्यांनी राजू शेट्टींविरोधात भूमिका घेतली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधवांची पक्षातून हकालपट्टीही केली. जाधव हे स्वतः ठाकरे गटाकडून इचलकरंजीसाठी इच्छूक होते. मात्र त्यांच्याविरूद्ध काही दिवसांपासून तक्रारी वाढू लागल्यात असं सांगितलं जात आहे.

Published on: Jan 05, 2024 11:53 AM
श्रीरामाच्या वादग्रस्त वक्तव्यानं रोष, आव्हाड यांचा वध करणार; थेट अयोध्येतून काय आली धमकी?
श्रीराम काय खायचे माहित नाही, पण राष्ट्रवादीनं पैसे खाल्ले, आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेचा घणाघात