दाढी कुणाला खुपली? मुख्यमंत्री शिंदे अन् राऊत यांच्यात जुंपली, बघा वार-पलटवार
एकनाथ शिंदे यांची दाढी दिल्लीच्या हातात आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदे यांच्या दाढीसह ते ज्या लंकेत गेलेत ती लंकाच पेटवणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : एकनाथ शिंदे यांची दाढी दिल्लीच्या हातात आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदे यांच्या दाढीसह ते ज्या लंकेत गेलेत ती लंकाच पेटवणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तर लंकेचा विषय करून नका तुम्ही सगळे लोकं रावण आहात. आधी रामायण वाचून घ्या, रावणाची लंका दहन झालेली आणि महाराष्ट्रात रामाचं वास्तव्य होतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान, दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दाढीवरून केलेल्या टीकेवर दिलंय. तर कुणीही माझ्या नादाला लागू नका, मी कुणालाही आडवं जात नाही, पण माझ्या आडव्यात कुणी आलं तर मी त्याला सोडत नाही…असा खोचक टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला आहे. यावर संजय राऊत यांनी पलटवार केलाय.