Saamana : “भाजप हा ढोंग्यांचा पक्ष…’भोंदू भूषण’असा किताब भाजपच्या चाणक्यांना…”, ‘सामना’तून खोचक टीका करत हल्लाबोल
राज्यातील सरकार मोदींच्या तंबूतील जम्बो सर्कस आहे काय? असा खोचक सवाल सामनामधून करण्यात आला असून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे
भाजप हा ढोंग्यांचा पक्ष असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून हा निशाणा साधण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने उपमुख्यमंत्री केलं. इतकंच नाहीतर अजित पवार यांची आयकरने जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत करण्यात आली. राज्यातील सरकार मोदींच्या तंबूतील जम्बो सर्कस आहे काय? असा खोचक सवाल सामनामधून करण्यात आला असून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘भाजप हा ढोंग्यांचा पक्ष आहे. हेच भोंदू लोक सिंचन घोटाळ्याच्या पैशांतून मिळवलेली अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता पवित्र करतात. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजित पवारांना भाजपने उपमुख्यमंत्री तर केलेच, वर जप्त केलेली इस्टेटही सन्मानाने परत केली’, असे म्हणत भाजपवर हल्लाबोल कऱण्यात आलाय. तर राष्ट्रद्रोही वगैरे आरोप करून शाहरुख खान याला ‘रेड कार्पेट’वरून शपथ सोहळ्यात निमंत्रित केले. पद्मभूषणप्रमाणे एखादा ‘भोंदू भूषण’ असा ‘किताब’ आता तयार करून तो या भाजपच्या पडद्यामागील चाणक्यांना द्यायलाच हवा, असं म्हणत सामानातून भाजपवर खोचक टीका करण्यात आली आहे.