Uddhav Thackeray : विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हरामखोर आहेत ते…’, रोख नेमका कोणाकडे?
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी देखील सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.
राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संपले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटचा दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. विधानभवन परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांच्यासोबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी कोणालातरी उद्देशून हरामखोर आहेत ते असं म्हटलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य आणि वरुण सरदेसाईंसोबतचा हा संवाद माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र उद्धव ठाकरे नेमंक कोणाला हरामखोर आहेत ते…असं म्हणाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच सध्या चर्चा होत आहे.
Published on: Mar 27, 2025 12:54 PM