उद्या ‘एमआयएम’शी युती करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका
.. तर हे कदापि शक्य झालं नसतं, पण उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
भाजप ही एमआयएमची बी टीम आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता. दानवे यांच्या या टीकेचाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे हे 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर परखड टीका करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. बाळासाहेब ठाकरे असते तर हे कदापि शक्य झालं नसतं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला होता, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे मी शिवसेना बंद करेल पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही, असा विचार त्यांचा होता.
शिवसेना मोडीत काढेन पण प्रकाश आंबेडकर यांच्या तत्त्वाशी कधीच जुळवून घेणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. तरीही उद्धव ठाकरे यांनी युती केली. उद्या उद्धव ठाकरे हे एमआयएमशीही युती करतील, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.