ईव्हीएम अन् ईडीच्या कारवायांवरून पुन्हा घमासान, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
अजित पवार यांच्या सत्तासहभागापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर आणि सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. मात्र त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. यावरूनच उद्धव ठाकरे सडकून टीका केली आहे.
मुंबई, २ फेब्रुवारी २०२४ : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. तर शिखर बँक घोटाळा प्रकरणात महाराष्ट्रात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार यांच्या सत्तासहभागापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर आणि सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. मात्र त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. यावरूनच उद्धव ठाकरे सडकून टीका केली आहे. भाजपकडून दडपशाहीचा आरोप करत प्रत्येक विरोधी राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर दुसरीकडे पंजाबमध्ये चंदीगड महापौर निवडीवरून राजकारण चांगलंय रंगलंय. हायकोर्टाने केस रद्द केली त्यानंतर आम आदमी पक्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. आप आणि काँग्रेसकडे १५ चं बहुमत होतं मात्र ८ मतं अवैध्य ठरवल्याने तिथे भाजपचा महापौर आणि उपमहापौर झालाय.