Uddhav Thackeray : … तर राज्यातील ४८ खासदारांनी एकजुटीनं राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी काय?

| Updated on: Oct 31, 2023 | 5:12 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर त्यांनी चर्चा केली. यावेळी दोन्ही मुख्यमंत्री बैठकीला गैरहजर होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केलाय.

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोदींसमोर आरक्षणाचा मुद्दा मांडावा, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना हे आवाहन केले आहे. केंद्रात मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी एकजुटीनं राजीनामा द्यावा, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मणिपूर जळतंय महाराष्ट्र पेटत आहे, मोदी भाषण करून जातात., काही फरक पडत नाही. दिल्लीच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्यातील सर्व मंत्र्यांनी गोयलसह गडकरी, दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर मंत्र्यांनी महाराष्ट्रातील अस्वस्थतेबाबत पंतप्रधानांना सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रात जातीच्या भींती उभ्या राहत आहेत. तुम्ही सर्व समावेशक आरक्षण देणार आहात की नाही असं मोदींना विचारलं पाहिजे. आरक्षण देणार नसाल तर आम्ही राजीनामे देत आहोत, असं मराठी मंत्र्यांनी म्हटलं पाहिजे. या राजीनाम्यानंतर मोदींवर काही फरक पडला नाही तर राज्यातील सर्व पक्षाच्या ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा, असेही ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 31, 2023 05:08 PM
Hingoli : मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, आंदोलकांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू
Eknath Shinde : मराठा आरक्षणावर तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना फटकारलं