पुढील चर्चा लिफ्टमध्येच… देवेंद्र फडणवीसांसोबतच्या एकत्र प्रवासानंतर उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

| Updated on: Jun 27, 2024 | 4:35 PM

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे अचानक आज आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसतेय. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात यावेळी काय चर्चा झाली? अशा चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. मात्र या चर्चांवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे अचानक आज आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. दोघांची आज विधानभवनात अचानक योगायोगाने भेट झाल्याचे पाहायला मिळाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसतेय. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात यावेळी काय चर्चा झाली? अशा चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. मात्र या चर्चांवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही लिफ्टमध्ये एकत्र होतो. अनेकांना वाटलं असेल ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे… ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट झाली. आमच्यात काही चर्चा नाही. भिंतीला कान असतात पण लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आमच्या पुढील गुप्त बैठका, चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू” असही उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले. बघा व्हिडीओ

Published on: Jun 27, 2024 04:35 PM
फडणवीस-ठाकरे एकत्र आले अन् ‘हा’ भाजप नेता दिसताच म्हणाले, याला आधी बाहेर काढा…
हस्तांदोलन ते हास्य विनोद… विधान भवनाच्या पायऱ्यांवर अचानक भेट?; ‘या’ दोन नेत्यांच्या भेटीत दडलंय काय?