नारायण राणे यांनी त्यांचा आत्मा विकला असेल, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!
VIDEO | नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचं वाचन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी काय लगावला नेमका खोचक टोला?
रत्नागिरी : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वर्तुळासह कोकणात घमासान सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. बारसू येथे रिफायनरी विरोधात राजकीय समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, बारसूची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचवली होती मात्र ते आता विरोध दर्शवत असल्याने त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होताना दिसते. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी बारसूच्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि कातळशिल्प येथेही भेट दिली. त्यानंतर, त्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचं आत्मचरित्र वाचून दाखवलं. ज्यामध्ये नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता असे म्हटले आहे. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, नारायण राणे यांनी आता त्यांचा आत्मा विकला असेल, असे म्हणत खोचक टीकाही केली.