देवेंद्र फडणवीसांना तुरूंगात टाका, ‘त्या’ वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
फक्त सत्ता, खुर्चीसाठी भाजपच्या पाठित खंजीर खुपसलं…त्यावेळी भाजपचा विजय झाल्यावर लोकांनी म्हटलं… मी पुन्हा येईन म्हटलं होतं आणि फडणवीस आले... या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय.
मुंबई | 18 मार्च 2024 : नुसतं पुन्हा आलो नाही तर दोन पक्षांना फोडून आल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं. फक्त सत्ता, खुर्चीसाठी भाजपच्या पाठित खंजीर खुपसलं…त्यावेळी भाजपचा विजय झाल्यावर लोकांनी म्हटलं… मी पुन्हा येईन म्हटलं होतं आणि फडणवीस आले… या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय. ‘ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून मिंधे सांगतात आम्ही भाजपच्या नादी लागलो. पण तसं नाही.. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मी पुन्हा येईन…दोन पक्षांना फोडून पुन्हा आलो आहे…किती नालायक वृत्तीची लोकं आहे. दोन पक्ष फोडले…दुसऱ्यांची संपत्ती लुटून घरं फोडून हे सांगताय आम्ही श्रीमंत झालोय. यांना खरंतरं तुरूंगात टाकलं पाहिजे… ‘, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. ‘काही जणांना दोन पक्ष फोडून पुन्हा आल्याचा अभिमान असतो, तुम्ही घरफोडे… फडणवीस यांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका. त्यामुळे आता तुमचं चिन्ह कमळ वैगरे नको तर हातोडा सारखं काहीतरी घ्या’, असाही टोला त्यांनी काल लगावला होता.