‘चुकीला माफी पण…’, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना इशारा, नेमकं काय म्हणाले?
VIDEO | 'शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही', उद्धव ठाकरे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी काय म्हणाले?
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वाकचौरे परत शिवसेनेत आलेत. शिवसेना सोडल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून वाकचौरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. पुढे ते उद्धव ठाकरे असे म्हणाले की, भाऊसाहेबांनी चूक केली होती, पण पाप केले नव्हते. भाऊसाहेब माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण शिवसैनिकांची माफी मागावी. पक्ष संपवणारा विरोधक पहिल्यांदा आपण पाहत आहोत. शिवसैनिक चुकीला माफी देतो. पण पापाला माफी देत नाही. राजकारणातून गद्दारांना संपवायचं आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला आहे.