‘हे सरकार डबल इंजिन, मग तिसरं लागलं ते काय? इंजिन की डालड्याचा डबा?’ शिंदे – फडणवीस सरकारवर खोचक टीका
VIDEO | 'दिल्लीसमोर मुजरा करणारे हुजरे महाराष्ट्राला काय न्याय देणार?', एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर कुणी केला जोरदार घणाघात?
मुंबई : राज्यातील सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार की डालड्याचा डबा?, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री वारंवार आपल्या भाषणातून हे वेगवाग सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे, असा उल्लेख करत असतात. दरम्यान, तुम्ही या सरकारला डबल इंजिन म्हणताय. मग तिसरं लागलं ते काय आहे? ते इंजिन नाहीये का? की डालड्याचा डबा आहे. मध्ये डबेच नाहीयेत, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर करत त्यांनी टोला लगावला. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चोर वाटेने किंवा चोरून मारून सीएम करण्याची वेळ आली नसती. फॉर्म्युल्याप्रमाणे वागला असतात तर उपद्व्याप करावे लागले नसते, असे सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.