‘… तर चोरून मारून सीएम करण्याची वेळ आली नसती’, शिंदे – फडणवीस यांच्यावर कुणाचा निशाणा?

| Updated on: Jul 26, 2023 | 8:42 AM

VIDEO | एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणी केला हल्लाबोल, थेट मुख्यमंत्रीपदावर केला सवाल?

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चोर वाटेने किंवा चोरून मारून सीएम करण्याची वेळ आली नसती. फॉर्म्युल्याप्रमाणे वागला असतात तर उपद्व्याप करावे लागले नसते, असे सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. चोरवाटेने किंवा चोरून मारून हे उपदव्याप करावेच लागले नसते. ज्यांना मुख्यमंत्री होता आले असते त्यांना दुसऱ्यांना कुणाला तरी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागत आहे. उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येऊनही त्यांना पार्टनर घ्यावा लागतोय. ही अशी वेळ त्यांच्यावर आली नसती, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला. तर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित होणार असून यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं आणखी काय काय भाष्य करणार आणि कोणावर टीकास्त्र सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Jul 26, 2023 08:28 AM
पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा; इस्लाम स्वीकारत केला नसरुल्लाशी निकाह, पाहा व्हिडीओ..
भावाच्या नात्यानं ओवाळणी देतो”, अजितदादांच्या विधानावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “सावत्र भावासारखा…”