महिलेला शिवीगाळ अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले…

| Updated on: Apr 02, 2023 | 11:17 PM

VIDEO | 'ही गटारगंगा मी शिवसेनेत असताना खपवून घेतली नाही आणि घेणार नाही', उद्धव ठाकरे यांचा घणाघात

संभाजी नगर : ‘कशाला छत्रपती आणि हिंदुत्वाचं नाव घेता? ज्या छत्रपतींना कल्याणच्या सुभेदारांच्या सूनेला सन्मानाने ओटी भरून परत पाठवलं होतं हे आमचं हिंदुत्व होतं. आणि तुम्ही सगळ्यांना छळतात. शिंदे गटातील एक मंत्री सुप्रिया सुळे यांना शिवी देतो, हे तुमचं हिंदुत्व?’, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत जोरदार निशाणा साधला. दुसरा नेता आमच्या सुषमा अंधारेंना खालच्या पातळीवर बोलतो हे तुमचं हिंदुत्व. हे ज्यावेळेला शिवसेनेत होते, तेव्हा त्यांची असे बोलण्याची हिंमत नव्हती आणि असे केले असते तर हाकलून दिलं असतं. महिलेला शिवीगाळ करणं ही गटारगंगा शिवसेनेत मी कधी खपवून घेतली नव्हती आणि घेणार नाही. तुम्ही हातात भगवा घेऊन अशा यात्रा करायच्या? तुम्ही भगवा हाती घेऊ नका, तो तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी चांगलंच विरोधकांना संभाजीनगरच्या सभेत ठणकावलं.

Published on: Apr 02, 2023 11:16 PM
‘सभेत सुद्धा वाचू का? विचारलं जातं’, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नेमका काय लगावला टोला
उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आमचा बाप…’