यांना बापसुद्धा इतरांचा लागतो, हिंमत असेल तर…, उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता कुणावर हल्लाबोल
VIDEO | संभाजीनगर मधील वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर केली सडकून टीका
संभाजीनगर : “आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला सगळे येतात पण संकट येतं तेव्हा कोण येतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लाथ मारत आहेत. त्यांना खाली खेचायचं आहे. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन मैदानात यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी, मी बाळासाहेब यांचं नाव घेऊन येतो… होऊन जाऊद्या”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत केला.