तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?

| Updated on: May 17, 2024 | 11:21 PM

उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले, मराठी माणसाला त्रास दिला तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवया राहणार नाही. मोदींनाही सांगतो, गुजराती, मराठी आणि हिंदी सर्व एकत्र राहत आहेत. आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. कुठे आग लागली शिवसैनिक जातो. तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण आहेस?

महाविकास आघाडीची सभा बांद्रा येथील बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले, मराठी माणसाला त्रास दिला तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवया राहणार नाही. मोदींनाही सांगतो, गुजराती, मराठी आणि हिंदी सर्व एकत्र राहत आहेत. आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत. कुठे आग लागली शिवसैनिक जातो. तो वाचवणाऱ्याला विचारत नाही तू कोण आहेस? मुसलमान आहेस, मराठी आहेस, उत्तर भारतीय आहे? तुमचे जे पूर्वज होते त्यांनी मराठी माणसांना गोळ्या घातल्या होत्या. म्हणून एकशे पाच हुतात्मे झाले होते. संघर्ष करून रक्त सांडून ही मुंबई आम्ही मिळवलेली आहे. मोरारजी म्हणत होते मराठी माणसाला इकडे प्रवेश देणार नाही. आम्ही गुजराती लोकांविरुद्ध नाही, असे ठाकरेंनी सांगितले. तर कोरोनाच्या काळात मी मोदी आणि शाह यांना सांगितलं आम्ही पैसे देतो गाड्या उपलब्ध करून द्या. नाही नाही म्हटलं. काही दिवसांनी संयमाचा बांध तुटला. लोक चालत गेले. आम्ही या मजुरांना जेवण देत होतो. औषध पाणी देत होतो. पण मोदी सरकारने आपल्याला ट्रेन दिली नव्हती. गंगते प्रेत वाहत होती. तेव्हा गंगेचे अश्रू पुसण्यासाठी तुम्ही का गेला नाही? असा सवाल करत ठाकरेंनी जोरदार टीका केली.

Published on: May 17, 2024 11:19 PM
‘शिवतीर्था’वरून नरेंद्र मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना….
Mega Block : रविवारी ‘या’ मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर