Uddhav Thackeray : ‘…तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल’, ‘मातोश्री’वरील बैठकीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 03, 2024 | 4:36 PM

मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. तर सध्या सुरू असलेल्या नाट्यात एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपची मोठ्या शक्ती असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई पालिका निवडणूक होईपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांना गोंजारेल आणि निवडणुकीतील हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचं ते करेल, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. तर सध्या सुरू असलेल्या नाट्यात एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपची मोठ्या शक्ती असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंचं करतील. आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे. उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Dec 03, 2024 04:36 PM