‘नरक्षभकाप्रमाणे सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये’, उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले

| Updated on: Jul 26, 2023 | 12:57 PM

VIDEO | भाजपला सत्ताभक्षक म्हणत उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादीसोबत जाणं ही भाजपची कूटनीती आहे की मेतकूट नीती आहे हे मला माहीत नाही. पण या कूटनीतीला आता ककुटून टाकण्याची वेळ आली आहे. नरक्षभक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे.त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीन पक्षच एनडीएत आहेत. तेच शिल्लक उरलेत, अशी टीका करतानाच एनडीएतील इतर पक्षांचा एकही खासदार नाही. खरी शिवसेना तरी कुठे एनडीएत आहे. तिथे फक्त गद्दार आहेत, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

Published on: Jul 26, 2023 12:46 PM
पंतप्रधान मोदी यांचा ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल; संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले…
भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले… ‘कोणी कोणाला भेटलं की…’